दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 66.93 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 50.93 रुपये असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. गेल्या महिन्यात 16 मे रोजी पेट्रोल 3.13 रुपयांनी व डिझेल 2.71 रुपयांनी महागले होते.
पेट्रोलच्या दरांत 64 पैशांनी वाढ
नवी दिल्ली – डिझेलच्या दरांत एक रुपया 35 पैशांनी कपात, तर पेट्रोलच्या दरांत 64 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी आज घेतला. जागतिक बाजारपेठांतील किमतीनुसार हा बदल करण्यात आल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. मे महिन्यापासून तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल मात्र गेल्या महिन्याभरात दोनदा स्वस्त झाले आहे. दरांतील बदल आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.