महापालिकेने अशा प्रकारे स्ट्रिंग ऑपरेशन करून केलेल्या या कारवाईचे कौतुक करावे लागेल . नेमकी हि कारवाई कशी आहे ते पाहू …
हिंगणे खुर्द येथील पियुष हावूस मधील फ्ल्याट क्रमांक १० मध्ये चालत असे प्रगती ज्योतिष यांचा धंदा… वृत्तपत्रात जाहिरात देवून विठ्ठल तुकाराम गन्जेवार उर्फ अण्णा गायत्री उपासक हे हा धंदा चालवीत जन्मकुंडलीवरून नौकरी , आजार , लग्न , संतती पुत्रकामेष्टी यज्ञा बाबत सल्ला देणाऱ्या या ज्योतिषाची जाहिरात वाचून गणेश बोऱ्हाडे नावाच्या नागरिकाने महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली . आणि विशेष म्हणजे ती आयुक्तांनी मनावर हि घेतली . आश्चर्य आणि कौतुक वाटावी अशी हि घटना आहे .
आयुक्तांनी मग सहायक आरोग्यप्रमुख वैशाली जाधव कायदेशीर सल्लागार विभागातील वकील निशा चव्हाण आणि अन्न निरीक्षक महेंद्र जगताप , अजित भुजबळ , रोहिदास सोनावणे यांचे पथक केले आणि या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून छुपे क्यामेरे, रेकॉर्डर वापरून स्ट्रिंग ऑपरेशन केले पुत्रप्राप्तीसाठी साडेपाच हजार रुपये खर्च येईल असा यज्ञ करा असे सांगून या तथाकथित ज्योतिषाने धंदा मांडला होता
महापालिकेने त्याच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध )१९९४ आणि सुधारित २००३ कायद्याचे कलम २२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी कारवाई केली आहे .
महापालिकेच्या कारवाईने खटला दाखल होणार असला तरी यावर पोलिस कारवाई का नाही झाली हा प्रश्न हि अनुत्तरीत आहेच पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून यज्ञ करणे म्हणजे देवादिकांच्या नावाने फसवणूक करणे असेही याप्रकरणात दिसते आहे . यानुसार कारवाया झाल्या तर पुण्यातील गलेलठ्ठ असे ज्योतिष महापालिकेच्या आणि पोलिसांच्याही गळाला लागतील आणि भोळ्याभाबड्या जनतेची फसगत टळेल असे म्हणता येणार आहे