पुणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’च्या (जेआरव्हीजेटीआय) विद्यार्थ्यांनी फॅशन डिझाईन,ग्राफिक डिझाईन, ज्वेलरी डिझाईन आणि डिजिटल फोटोग्राफी या विषयांतील प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन आजपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरू झाले. इन्स्टिट्यूटच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. मोहन स्वामी यांच्या हस्ते आणि संचालक डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शन १३ जूनपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.