पुणे-
” स्वत:ची क्षमता जाणीवपूर्वक विकसित करा. सर्वच क्षेत्रात संधी असतात फक्त आपण सर्वोच्चतेचा ध्यास घेतला पाहिजे ” असे प्रतिपादन प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांनी केले. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, पेस कॉम्प्यूटर्स व स्पेक्ट्रम फाउंडेशन आयोजित ” यशाची गुरुकिल्ली ” या करिअर मार्गदर्शन व्याख्यानात ते बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीप-प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सिरम चे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप दवे, महापालिका माध्यमिक शिक्षण विभागप्रमुख मीनाक्षी राउत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश होले, अमिताभ मेहता, अरिहंत कॉलेजचे विकास घोगरे, अनिल रोकडे, संतोष जाधव, विलास लोंढे उपस्थित होते. गणेशवंदन नृत्याने कार्यक्रमाचा आरंभ झाला. व्याख्यानास मोठा प्रतिसाद लाभला.
कांबळे म्हणाले ” निवडलेल्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून सर्वोत्तम ज्ञान प्राप्त करा. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य आत्मसात करावीत. ”
टिळेकर म्हणाले ” सोशल नेट्वर्किंग हि मोठी ताकत असून त्याचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करावा. शिक्षणा बरोबरच खेळ आणि कलांचीही जोपासना करावी ”
या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्र संचालन संतोष देशमुख यांनी केले. राष्ट्रीय एकत्मतेवरील फ्याशन शो सादर करण्यात आला. पसायदानाने कार्याक्रमची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बनकर, कृष्णा चव्हाण, हर्शल सोनानी, सुनील जाधव, जय मेहता प्रतिक जोशी, आयुष तिवारी, प्रतिक अगरवाल, यश शहा, केदार संगारे, चेतन गुंड, मिलिंद चव्हाण, सौरव क्षीरसागर, स्नेहल जगताप, किरण नरके, संजना जांभूळकर, प्रियांका रोकडे , सुकन्या कारंडे, नेहा चनालीया, पूजा कदम, विजय खोत, साफिर मोतीवाला, दर्शन चौधरी यांनी परिश्रम घेतले.