पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनतर्फे ‘स्वरज्योती’ या गायन व वादन यावरआधारित सांगितिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी दिनांक १५ रोजी म्हात्रे पूलाजवळील घरकुल लॉन्स येथे सायंकाळी ५ वाजता ही मैफिल रंगणार आहे अशी माहिती ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनच्या विश्वस्त भाग्यश्री कुलकर्णी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेच्या इतर विश्वस्त तन्वी कुलकर्णी, अश्विनी देशपांडे, गौरी पठारे ही यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची माहिती देताना भाग्यश्री कुलकर्णी म्हणाल्या या कार्यक्रमात गायिका गौरी पाठारे, प्रसिद्ध व्हायोलिन वादक संगीता शंकर आणि रागिणी शंकर आपली सुरेल कला सादर करणार आहेत. त्यांना पंडिता अनुराधा पाल(तबला)आणि सुप्रिया जोशी (हार्मोनियम) साथ संगत करणार आहेत.
अश्विनी देशपांडे पुढे म्हणाल्या, महिलांनी महिलांसाठी सुरु केलेली संस्था म्हणजे ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशन. आज विविध क्षेत्रात महिला भरारी घेत आहेत. अशा महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करतो. स्वरज्योती कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न असून यास रसिक पुणेकरांची भरभरून साथ लाभेल असा विश्वास आम्हाला वाटतो.