पुणे-मिळकत कर आकारणी पासून दूर राहिलेल्या छुप्या मिळकती पुणे महापालिका हद्दीत असून त्यांचा शोध घेण्याची मोहीम २१ ते ३१ में दरम्यान राबविण्यात येईल असे येथे पालिकेचे उपायुक्त आणि मिळकत कर विभागाचे प्रभारी प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले .
पालिका हद्दीत अनेक इमारती ,मिळकती बांधल्या गेल्या त्यांची खरेदी विक्री केली गेली .मात्र महापालिकेकडे मिळकत कर आकारणी साठी सुमारे साडेआठ लाख मिळकतींची नोंद आहे. निबंधक कार्यालय आणि पालिका मिळकत कर विभाग यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने स्वतः जे मिळकत मालक कर आकारणीसाठी पालिकेत येतात अशांचीच मिळकत कर विभागात नोंद होते .पण अशा नोंदी करवून घेण्यापासून म्हणजे कर आकारणी पासून दूर राहिलेल्या अनेक छुप्या मिळकती असाव्यात असा कयास आहे . त्यांची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे मोळक यांनी सांगितले ..पहा नेमके मोळक यांनी काय म्हटले आहे ….