दिल्ली :
कोळसा विशेष तरतुदी विषयक, विधेयक सुधारणांसाठी राज्यसभेच्या ‘सिलेक्ट कमिटी’कडे सुपूर्द करण्यात आले आहे. विधेयकातील संभाव्य बदलावर ही समिती काम करणार आहे. 19 खासदारांच्या या समितीत राज्यसभेतील 10 सदस्य समितीवर असून, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड.वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. अनिल दवे या कमिटीचे अध्यक्ष आहेत. दिनांक 18 मार्च 2015 या तारखेपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करेल.