![कोथरूड नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन](http://marathipatrakar.cspacedesigns.com/wp-content/uploads/2014/09/unnamed-203x300.jpg)
कोथरूड नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन
क्रीएटीव्ह फौंडेशन आणि कै.विश्वनाथ भेळके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड मधील डी.पी.रोड वर
भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यावर्षी ही दिनांक २५ सप्टेंबर रोजी
घटस्थापना होणार असून रोज रात्री दांडिया खेळला जाणार आहे.
या वर्षी २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फक्त महिलांसाठी लावणी चा कार्यक्रम यशवंतराव
चव्हाण नाट्यग्रहात होणार असून,३० सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता सप्तरंग महाराष्ट्राचे हा कार्यक्रम
होणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खरडेकर आणि विशाल भेलके यांनी सांगितले.
तसेच नवरात्रोत्सवात सामाजिक बांधिलकी च्या जाणीवेतून गरीब डोंगरी शाळा या संस्थेला धान्य
वाटप,तृतीय पंथीयाना साडी वाटप,मोफत आरोग्य शिबीर,अपंग मुलास सायकल वाटप,असे विविध
कार्यक्रम आयोजित केल्याचे ही संदीप खर्डेकर व विशाल भेलके यानी जाहीर केले.तसेच रविवार २८
सप्टेंबर रोजी महिलांची महा-आरती व कोजागिरी पौर्णिमेला दांडिया व दूध वाटप कार्यक्रम होणार
आहेत.सालाबाद प्रमाणे नागरिकांचा या सर्व कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभेल असे संदीप खर्डेकर
यांनी सांगितले.सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी खुले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.