नवी दिल्ली, 6 मे 2024
भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) 05 मे 2024 रोजी केरळच्या किनाऱ्याजवळ, बेपोरच्या पश्चिमेला असलेल्या समुद्री भागातून सहा भारतीय कर्मचाऱ्यांसह एक इराणी मासेमारी बोट ताब्यात घेतली. आयसीजीच्या बोटी आणि विमाने यांच्या वेगवान समुद्री-हवाई समन्वयासह ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
इराणी बोटीला अडवल्यानंतर, आयसीजीच्या जवानांच्या तुकडीने बोटीवर प्रवेश केला आणि देशविरोधी कारवायांमधील सहभागाचा शोध घेण्याच्या दृष्टीने या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती असे दिसून आले की या बोटीचा मालक इराणी नागरिक असून त्याने तामिळनाडूमधील मासेमारांना कंत्राटी स्वरूपाच्या व्यवहारातून बोटीवर काम दिले आणि त्यांना इराण जवळील समुद्रात मासेमारी करण्यासाठी इराणी व्हिसा मिळवून दिले.