कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्या -मागणी

Date:

पुणे- कॅन्टोन्मेंट बोर्डामधील कर्मचारी बांधवाना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी मिळण्याकरिता पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ व कामगार युवा सेना या तिन्ही संघटनाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच
बोर्डाचे उपाध्यक्ष नगरसेवक विवेक यादव यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष किशोर संघेलिया, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष मनोज पटेलिया व कामगार युवा सेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष चंद्रकांत धोंगडे आदी मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित होते.

केंद्रशासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासन २० फेब्रुवारीला शासकीय कर्मचारी यांना वेतन निश्चित सुधारित वेतन संबधित स्पष्टीकरण दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामधील कर्मचारी बांधवाना सुधारित वेतन नियम २०१९ प्रमाणे सातव्या वेतनाचा लाभ अजूनपर्यंत दिला गेला नाही. २ डिसेंबरपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात येईल, असे आश्वासन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींना दिली आहे.

यावेळी कर्मचारी बांधवानी बोर्डाचे उपाध्यक्ष नगरसेवक विवेक यादव यांच्याशी चर्चा करून आपली मागणी करण्यात आली. त्यांनी देखील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून आपली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर व नगरसेविका डॉ. किरण मंत्री उपस्थित होते.

अन्यथा पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघ ट्रेंड युनियन, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ व कामगार युवा सेना या तिन्ही संघटनाच्यावतीने आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...