पुणे:
“अग्रसेन समाज मार्केटयार्ड’च्या वतीने आयोजित 32 व्या “अगरवाल परिवार परिचय संमेलनास उत्तम प्रतिसाद मिळाला असून, पुढील रविवार दिनांक 21 जून रोजी आयोजित संमेलनाप्रसंगी कन्या जन्माचे स्वागत करण्यासाठी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक आर. एल. अग्रवाल यांनी दिली.
हे विनामूल्य संमेलन रविवार, दिनांक 14 जून रोजी “एस. एस. अगरवाल इंग्लिश मीडियम स्कूल’ (दत्तवाडी), पुणे येथे पार पडले. यावेळी शाम साधूराम अग्रवाल, विजय मित्तल, दिनेश अग्रवाल, रविंद्र अग्रवाल, विजय जगदीश अग्रवाल, आर.एल.अग्रवाल आदी उपस्थित होते.
आत्तापर्यंत या संमेलनाद्वारे 84 विवाह जमले असून, संमेलनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आर.एल.अगरवाल म्हणाले, “अग्रवाल समाजातील उपवर युवक युवतींना विवाह विषयक चर्चेच्या भेटीची, परिचयाची संधी मिळावी म्हणून “अग्रवाल परिवार परिचय संमेलन’ आयोजन करण्यात येते. अग्रवाल समाजातील कुटुंबाचा परिचय वाढणे आणि जास्तीत जास्त अग्रवाल समाजातील कुटुंबांनी एकत्र यावे या प्रमुख हेतूने दर रविवारी हे संमेलन आयोजित करण्यात येते.’
“अगरवाल परिवार परिचय’तर्फे विनामूल्य परिचय संमेलन “आर. एल. अगरवाल इंग्लिश मीडियम स्कूल’ दत्तवाडी पुणे येथे दर रविवारी दुपारी 3 वाजता होत असून, अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9561220000 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.