आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन

Date:

आळंदीत महापूर; पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे-आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक आवाहन केले आहे. दुसरीकडे मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्याने एसटी सेवा बंद करण्यात आली असून राज्यातील अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीने रौद्ररूप धारण केले आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने शहरात ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. नदीकाठचे घाट, मंदिर परिसर, धर्मशाळा, दुकाने आणि अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.

आषाढी वारीसाठी देशभरातून आलेल्या शेकडो वारकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० वारकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. नदीकाठी उभारण्यात आलेले चेंजिंग रूम आणि तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.

पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन जारी केले आहे. आळंदीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

नदीपात्र, घाट, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 वेगाने वारे वाहणार, घराबाहेर पडणे टाळावे, CM देवेंद्र फडणीस यांचे आवाहन

मुंबई-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज...

मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात पूर आणि दरडींचे संकट; पीएमआरडीएची विविध ठिकाणी बचावमोहीम

चाकणमध्ये पाण्यात अडकलेल्या २० ते २५ जणांची सुटका; मळवली,...

इंद्रायणीचा रौद्रावतार! आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; 250 वारकऱ्यांची सुरक्षित सुटका

पुणे | प्रतिनिधी राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका...

खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला! संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका

टक्केवारीचे सरकार...सीतामाईचे मंगळसूत्रही लुटले; आता महाराष्ट्रात आंदोलनाचा वणवा पेटणार मुंबई-मुंबई-पुणे...