भाजपचे काही जण घरात बसून लाटेवर निवडून आलेले आहेत , परंतु या लाटेमध्ये सर्वजण वाहून जाणार आहेत त्यामुळे शिवसैनिकच खऱ्या अर्थाने काम करणारा राहणार आहे कारण शिवसैनिकाकडे गेल्यावर नागरिकांना कामे होतील असा आत्मविश्वास आहे , शिवसेना जनाधार असलेला पक्ष आहे . माझे सर्व सहकारी वाघाचे काम करणारे आहेत , त्यासाठी या सर्वाना बरोबर घेऊन शहरात बैठका घेऊन शिवसेना बळकट करणार आहे आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले .
पुणे कॅम्प भागातील अग्रवाल कॉलनीमधील पुष्पा हॉलमध्ये शिवसेना पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाची प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली , त्यावेळी विनायक निम्हण यांनी मार्गदर्शन केले . या बैठकीस शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , शाम देशपांडे , सचिन तावरे , संजय मोरे , महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे शहर अध्यक्ष महेश जगताप , शिवसेना पुणे शहर संघटिका राधिका हरिचन्द्रे , शिक्षण मंडळ सदस्या निर्मला केंढे , नगरसेविका सोनम झेंडे , रोहिणी कोल्हाळ , सपना ढवळे , शिवसेना पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ विभागप्रमुख जावेद खान , अतुल गोंदकर , दत्ताजी जाधव , गजानन थरकुडे , विकी पिल्ले , सुधीर ढवळे , सचिन हिरवे , मनीष सोनिग्रा , एकनाथ ढोले , मयुर झेंडे , उत्तम भुजबळ , युवा सेनेचे राहुल केवटे , किरण साळी , कैलास भोज , चंदू खुणेकरी आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक सचिन तावरे यांनी सांगितले कि , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद आहे , विनायक निम्हण यांच्यामुळे शिवसेनेला संजीवनी मिळाली आहे . त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविणार असून या भगव्याचे मानकरी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकच राहतील असा विश्वास व्यक्त केला .
या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या बैठकीचे सूत्रसंचालन अतुल गोंदकर यांनी केले .