द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शिक्षक दिनानिमित पुणे शहरातील ४२ शाळांमधील शिक्षकांचा ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आय. टी. खान , प्रमुख पाहुणे पुणे शहराचे उपमहापौर आबा बागुल , पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख , कार्यक्रमाचे संयोजक द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , हाजी गुलाम ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नवर पीरभाई, माजी नगसेवक अड. आयुब शेख , प्रसिध्द इस्लाम धर्माचे अभ्यासक अनिस चिस्ती , हाजी कासम बियाबानी , मुस्लिम को ऑप बँकेचे संचालक अली इनामदार , बीना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी इकबाल खान , अड. सलीम शेख , सिकंदर शेख , रुख्सार वाहिद बियाबानी , मुबारक जमादार , मोहम्मद मुत्तलिब , अहमद बागवान , अब्दुल गनी सर आदी मान्यवर उपस्थित होते .
पुणे शहरातील मराठी , उर्दू व इंग्रजी शाळांमधील तसेच पुणे महापालिका शाळामधील शिक्षकांना पुणे शहराचे उपमहापौर आबा बागुल यांच्याहस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच , डॉ. ए. आर. शेख यांना ए.पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार आणि स्व. अब्दुल्ला मलिक साहब यांच्या स्मरणार्थ पाचहजार सातशे श्याऐंशी रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले . प्रसिध्द इस्लाम धर्माचे अभ्यासक अनिस चिस्ती यांना मौलाना अबुल कलाम आझाद जीवन गौरव पुरस्कार , बीना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी इकबाल खान यांना सर सय्यद अहमद खान जीवन गौरव पुरस्कार , नोबल असोसिएशनचे अध्यक्षा सौ. फरीदा सुंडके यांना सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . तसेच , न्यू ग्रेस इंग्लिश हायस्कूलचे अध्यक्ष जकी शेख यांना शाळेच्या दहावीचा १०० टक्के निकाल लावल्याबद्दल यांना उत्कृष्ट शाळेचा प्रथम पुरस्कार , तसेच आल्जदित उर्दू हायस्कूल द्वितीय पुरस्कार आणि पुणे महापालिकेच्या हकीम आजमल खान उर्दू हायस्कूल यांना तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्काराथी शिक्षकामधून लकी ड्रा काढण्यात आला , त्यामध्ये आयडीयल इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका कपिला शेलार यांना सालाबादप्रमाणे सोन्याची अंगठी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते देण्यात आली . यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी यांनी केले तर सूत्रसंचालन शहबाज शहा यांनी केले तर आभार रुकसार वाहिद शेख यांनी मानले .