श्री. गुरु गोरखनाथजी महाराज जयंती (प्रकट दिन ) निमित गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्ट आणि लष्कर बेडा पंचायत , करण मकवानी मित्र मंडळ आणि अशोक संघेलीया भगत निशाण आखाडा आणि जय मातादी मित्र मंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले .
पुणे कॅम्प भागातील पुलगेट पोलिस चौकी समोरील गोगा समाधीस्थळ आवारात हे सर्व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . यामध्ये गुरु गोरखनाथजी सहस्त्रावली चे होमहवन झाले , तसेच , आळंदी येथील श्री. श्री . श्रीमंत योगी दिग्विजयनाथ महाराज यांच्या हस्ते श्री. गुरु गोरखनाथजी यांची महा आरती करण्यात आली . यावेळी पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांनी गुरु गोरखनाथजी यांचे भजन – गायन केले .यावेळी उपस्थित भक्तांनी महाप्रसादचा लाभ घेतला .
यावेळी गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्टचे अध्यक्ष सुदेश सारवान , सचिव हरीश करोते , माजी नगरसेवक करण मकवानी , विनोद मथुरावाला , कविराज संघेलीया , मंगेश चंद्रमौर्य , सतीश लालबिगे , पुजारी हेमंत पुजारी , आंतर राष्ट्रीय कलाकार कैलाश कुमार , महेश जेधे , लक्ष्मण सुसगोहेर , किशोर संघेलीया , सुरेश मकवानी , विक्रम गोहेर , विनोद म्हेत्रे , अर्जुन सोलंकी , नवीन मकवानी , सुनील चौहान , प्रेमालाबाई सोलंकी , विशाल चव्हाण , राजेश सहेरिया आदी मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्टचे सचिव हरीश करोते यांनी केले तर सूत्रसंचालन आंतर राष्ट्रीय कलाकार कैलाश कुमार यांनी केले तर आभार रवि सारवान यांनी मानले . यावेळी भक्ती गीतांचे सहगायन मेघन श्रीखंडे , हार्मोनियम उदय कुलकर्णी , तबला हनुमान फडतरे , टाळ अतुल गरुड , पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले . या भक्ती गीतांची कार्यक्रमाची सुरुवात शिव स्तुती महादेव देवो महेश्वरा , गोरखनाथ भजन , एक निरंजन घ्यावो , संत गुरुदास , कबीर , मीराबाई भजन , चोखा मेळा आदींची भजने झाली .