Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेतकऱ्याच्या हृदयाला मिळाली नवसंजीवनी ; रुबी हॉल क्लिनिकमध्ये रुग्णावर सवलतीच्या दरांत चौथी यशस्वी

Date:

पुणे. – चाळीस वर्षांचे शेतकरी बाळू कारके हे जीवन-मृत्यूचा लढा देत असताना शहरातील एका

प्रतिष्ठित रुग्णालयात भरती झाले होते. त्यांची हृदयाची डावी झडप जी दोन वेळा पूर्वी बदलली गेली

आणि पुन्हा खराब झाली, यालाच प्रोस्थेटिक व्हाल्व डिटिरिओरेशन म्हटले जाते. त्यामुळे

त्यांना शस्त्रक्रिया त्वरित करण्याचा सल्ला देण्यात आला होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून विविध

प्रकारच्या व्हाल्व बदलण्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या कारके यांना अत्यंत

धोका असल्याचे मानण्यात आले होते, त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली होती.

कारके आणि त्यांच्या कुटुंबियांना आशेचा किरण दाखवला तो रुबी हॉल क्लिनिकमधील हृदयरोग

शल्यविशारद डॉ. समीर भाटे यांनी. ते सांगतात, “डॉ. मिलिंद गडकरी यांनी कारके यांना माझ्याकडे

पाठविले होते. त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले तेव्हा ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या बाबतीत

हृदयाची झडप इतकी निकामी झाली होती, की  फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांना श्वास घेणेही

अशक्य झाले होते. ही हृदयावरील पुनःशस्त्रक्रिया होती त्यामुळे ती अधिकच धोकादायक ठरणारी

होती, कारण आधीच्या शस्त्रक्रियांमुळे हृदय छातीच्या हाडांशी चिकटले गेले होते.

डॉ. सुधीर भाटे आणि डॉ. स्वप्नील फुलादी यांच्या मदतीने तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर

डॉ. समीर भाटे यांनी खराब झालेली झडप बदलून त्याजागी थर्ड जनरेशन टिश्यू व्हाल्व बसविली.

टिश्यू व्हाल्व किंवा बायो-प्रोस्थेटिक व्हाल्वस् हे गाय किंवा डुकरांपासून बनविण्यात येतात आणि ते

मजबूत व लवचिक असतात. 70 वर्षेपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांमध्ये त्यांचे प्रत्यारोपण अयशस्वी

होण्याचे प्रमाण दहा वर्षांमध्ये केवळ 10 टक्कांपेक्षा कमी तर चाळीसपेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये 20-

30 टक्क्यांपेक्षा कमी असते. या झडपांचा कार्यकाळ दहा ते वीस वर्षे एवढा असतो आणि यांत्रिक

झडपांपेक्षा त्यांना अधिक पसंती देण्यात येते. याचे कारण म्हणजे यांत्रिक झ़डपा बसविल्यानंतर रुग्णांना

आयुष्यभर ‘वॅरफॅरिन’ सारखी रक्त पातळ करणारी औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे त्यांना सामान्य

जीवन जगणे अवघड बनते. शिवाय, वॅरफॅरिनच्या वापरामुळे अनेक समस्या उद्भवतात खासकरून

अशिक्षित आणि ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये. औषधाच्या कमी किंवा अधिक वापरामुळे अनेक गुंतागुंती

उद्भवू शकतात.

अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असते आणि तिचा किमान खर्च सात लाख रुपये

होतो. शेतकरी असल्यामुळे बाळू कारके आणि त्यांच्या कुटुंबियांची ही अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया

करण्याची आर्थिक ताकद नव्हती. याही बाबतीत रुबी हॉलने कारके कुटुंबियांना दिलासा देत या शास्त्र

क्रियेमध्ये सवलत दिली ज्यामुळे केवळ चार लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया करता आली. तसेच

डॉक्टरांनी त्यांच्याकडून कुठलेही व्यावसायिक शुल्क घेतले नाहीत.

ही शस्त्रक्रिया होऊन पाच महिने झाले असून आता बाळू कारके अधिक स्वस्थ आणि आनंदी

वाटतात. ते म्हणतात, “डॉ. समीर भाटे आणि रुबी हॉल क्लिनिकमधील त्यांच्या सहकाऱ्यांचा मी ऋणी

आहे, त्यांनी आमच्या कुटुंबाची अडचण ओळखून अगदी नेमक्या वेळी उपचार पुरविले. मला मिळालेले

उपचार आणि काळजी कोणत्याही बाबतीत कमी नव्हते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझा

व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि लवकरच मला सोडण्यात आले. आता मी बरा होत आहे आणि

हॉस्पिटलने मला हे आयुष्य दिले आहे, हे कायम माझ्या आठवणीत राहील.”

याबाबत बोलताना रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बोमी भोट म्हणाले, “दर्जेदार

आरोग्यसेवा ही समाजाच्या सर्व थरांतील लोकांपर्यंत पोचविणे, हे रुबी हॉल क्लिनिकचे लक्ष्य

आहे. दरवर्षी हॉस्पिटल गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरांमध्ये वैद्यकीय उपचार

पुरविते. गेल्या वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील कुटुंबांच्या चेहऱ्यावर स्मित उमटविण्यासाठी

हॉस्पिटलने एकूण 20 कोटी रुपये खर्च केले. रुग्णांवरील उपचार आणि शुश्रुषा यांमध्ये कोणतीही कसर

ठेवायची नाही, असा हृदयतज्ज्ञांच्या टीमचा प्रयत्न असतो. सर्वांना सुरक्षित आरोग्यसेवा पोचविण्याच्या

आमच्या उत्साहात यामुळे भरच पडते.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाचा इशारा

पुणे-भारतीय हवामान विभागाने पुढील दाेन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...