पुणे-बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात बऱ्यापैकी सुपरिचित असलेल्या विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस यांनी ओम डेव्हलपर्स च्या राजन रायसोनी (वय ५० , प्रभात रोड , पुणे )यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . रायसोनी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप फडणीसांना अटक करण्यात आलेली नाही .
विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस (रा . कल्पवृक्ष , स. नं . ४६/१ सी /१ डी. पी रोड . कर्वेनगर )यांना रायसोनी यांनी आपल्या ओम डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेत घेतले होते . त्यानंतर ओम च्या मालकीचे असलेले स. नं . ४०/१/१ अ आणि ४१/१/१ मधील प्लॉट नं १, २ ,३ .४ या मिळकतींवर बांधकाम क्कारण्यात आले . यातील व्यापारी बांधकाम हे माझ्या फडणीस प्रॉपर्तीज प्रा. ली . ला म्हणजे स्वतासाठी द्या अशी मागणी करीत फडणीस यांनी रायसोनी यांना ३ कोटी ९१ लाख ४६ हजाराचे धनादेश दिले आणि रायसोनी यांचा संस्थेमधून राजीनामा हि घेतला . आणि ठरल्याप्रमाणे पैसे हि दिले नाहीत
या प्रकरणातील २ कोटी ४१ लाख रुपये आणि व्याज न देता फसवणूक केली असा तक्रार अर्ज रायसोनी यांनी पोलिसांना दिला होता त्यावर तपास करून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे . गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कुलकर्णी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत