पुणे – पुणे विद्यापीठामध्ये आज (मंगळवार) अर्थशास्त्र विभागाच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली.
बालाजी मुंढे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नांदेड येथील आहे. मुंढे हा विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहत होता. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापी कळू शकलेले नाही. या आत्महत्येमुळे विद्यापीठामधील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्यात येत आहे.