सातारा, (जिमाका) : वांग मराठवाडी धरणग्रस्तांची 65 टक्के रक्कम कपात करुन घेतली होती. त्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असून ज्या प्रकल्पग्रस्तांनी बँक खात्याचे आवश्यक तपशील जलसंपदा विभागाकडे दिलेला आहे अशा खातेदारांच्या नावे व्याजाची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कराडचे लघु पाटबंधारे सर्व्हेक्षण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पी.ए. मुसळे यांनी दिली आहे.
ज्या प्रकल्पग्रस्तांनी अद्यापही त्यांच्या बँक खात्याबाबतचा तपशिल दिलेला नाही अशा खातेदारांनी त्यांच्या बँकेच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत जलसंपदा विभागाकडे जमा करावी, असे आवाहनही श्री. मुसळे यांनी केले आहे.
वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या रक्कमेवरील व्याजाचे वाटप सुरु
Date: