पुणे :
‘लायन्स क्लब इंटरनॅशनल 323 डी-2’च्या वतीने लायन्स शतक महोत्सवानिमित्त भाग म्हणून ‘व्हीजन क्लिनिक’ चा उद्घाटन समारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, आडले बुद्रूक, मावळ येथे रविवारी, दि. 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या ‘व्हीजन क्लिनिक’चे उद्घाटन संजय भेगडे (आमदार) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल राज मुछाल उपस्थित राहणार आहेत.
मावळ येथील आडले बुद्रूक, डोणे, आडले खुर्द, ओवळे, दिवडा, पुसाणे, चांदखेड, पाचाणे, कुसगाव या 9 गावांमध्ये ‘व्हीजन क्लिनिक’, प्राथमिक आरोग्य केंद्र, आडले बुद्रूक, मावळ येथे मोतीबिंदू तपासणी, डायबेटीस तपासणी, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाच्या वतीने दंत चिकित्सा तपासणी, लहान मुलांची आरोग्य तपासणी, स्त्रीरोग तपासणी ‘साईट फस्ट टीम’ आणि ‘मधुमेह तपासणी टीम’ च्या सहाय्याने दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्या रविवारी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये लायन्स नेत्र रूग्णालयाच्या संचालिका डॉ. वैभवी रावळ आणि प्रशांत चौधरी (‘पुणे सिरीऑलॉजिकल इन्स्टिट्यूट’ ब्लड बँक’) हे मार्गदर्शन करतील.
पुढील सहामहिन्यात या गावांमध्ये एकाही व्यक्तिला मोतीबिंदू राहणार नाही अशी योजना आहे. मोतीबिंदु असलेल्या सर्व रूग्णांची पुण्यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी प्रांतपाल राज मुछाल यांनी दिली.
यावेळी ‘लायन्स क्लब ऑफ पुना 323 डी-2’ च्या अध्यक्ष रेखा ठाकोर गिरीश मालपाणी (उपप्रांतपाल), शरदचंद्र पाटणकर (माजी प्रांतपाल), विजय सारडा (व्हिजन क्लिनिक प्रोजेक्ट चेअर पर्सन), शुभांगी गजेंद्र घोटकुले (सरपंच, आडले बुद्रूक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.