माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरदपवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसेवक फाउंडेशनच्यावतीने लहान मुलांसाठी अनोखे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन आज करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये दुर्मिळ परदेशी माशांचे प्रदर्शन, छोट्या रेल्वेची अदभूत दुनिया, कार्टून्सची दुनियादारी यांचे अनोखे दर्शन लहान मुलांना होणार आहे. एरंडवणा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासामोरील मैदानात हे प्रदर्शन १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत असेल.