जयपूर- राजस्थानात एका वऱ्हाडाच्या बसवर वीजेची तार कोसळल्याने सुमारे २५ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अनेक जण होरपळले आहेत.
टोंक जिल्ह्यातील सांच गावाजवळ ही धक्कादायक तितकीच दुर्दैवी घटना घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एका वऱ्हाडाची बस रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजेच्या खांबावरील३३केव्ही हायटेंशन तार अचानक तुटून बसच्या टपावर कोसळली. संपूर्ण बसमध्ये करंट उतरून विजेच्या धक्क्याने २५ जणांचा मृत्यू झाला.मात्र, जिल्हाधिकार्यांनी या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टोंक जिल्ह्यातील बाछेडा गावाचे रहिवासी जयराम यांचे चिरंजिव रामचरण यांच्या लग्नाचे हे वर्हाड आहे. बाछेडाहूनमोरला येथे हे वर्हाड जात होते. मोरलाचे माजी सरपंच रामधन यांच्या कन्येसोबत रामचरणचा आज (शुक्रवार) विवाह होणार होता. वर्हाड मोरला येथे पोहोचण्याआधीच सांस गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.सांस गावातील रहिवासी भंवरसिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच गावातील काही युवती मदतीसाठी धावून आल्या. युवतींनी स्वत: विजेची तार बाजुला करून बसमधून मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली.