Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रोजच्या धकाधकीच्या जीवनातमहोत्सव नागरिकांसाठी पर्वणीच-आ.माधुरी मिसाळ

Date:

पुणे-क्रीएटीव्ह फौंडेशन व कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने कोथरूड च्या छ.शिवाजी पुतळा
चौकात भव्य शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.दि.८ फे.ला सुरु झालेल्या महोत्सवात
७ दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सांगता झाली.दररोज हजारो कोथरूडकरांनी कीर्तनाचा आनंद लुटला.
यात प्रमुख्याने संत नामदेवांचे १७वे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास,महामंडलेश्वर अमृतदास महाराज,
छगन महाराज खडके(प्रती इंदोरिकर) रामचंद्र देखणे महाराज,बाल कीर्तनकार नागवे महाराज,यांच्या कीर्तनाने
कोथरूडकर भक्तिरसात चिंब न्हाले.
 महोत्सवाच्या आठव्या दिवशी फक्त महिलांसाठी भव्य लकी ड्रा चे आयोजन करण्यात आले होते.
लकी ड्रा चे वितरण करण्यासाठी माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार,आ.माधुरी मिसाळ,आ.योगेश टिळेकर,
आ.जगदीश मुळीक्,कॉंग्रेस चे शहराध्यक्ष अभय छाजेड,उत्तम भेलके,जगन्नाथ कुलकर्णी व इतर मान्यवर
उपस्थित होते.यावेळी सुमारे ३००० महिलांनी गर्दी केली होती,लावण्या किवा नृत्याच्या इतर कार्यक्रमा बरोबरच कीर्तन महोत्सवाला मिळालेला प्रतीसाद कोथरूड च्या संस्कृतिक परंपरेला साजेसा असल्याचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले.तर माधुरी ताई मिसाळ यांनी या महोत्सवाचे कौतुक करताना”रोजच्याधकाधकीच्या जीवनात महिलांना विरंगुळ्याचे चार क्षण या महोत्सवामुळे मिळतात,हे वाखाणण्याजोगे आहे,या लकी ड्रा द्वारे
अनेकांचे स्वप्न साकार झाले,कोणाला पैठणी मिळाल्याचा आनंद तर फ्रीज मिळविलेल्या राठोड वहिनींच्या आनंदाने पाणावलेल्या डोळ्यात स्वप्न साकारल्याचे दिसून येत होते.या सर्वच कार्यक्रमातून नागरिकांना मिळणारा आनंद अवर्णनीय असल्याचे ही त्यांनी नमूद केले.चांगल्या कामाची पावती नागरिक देतच असतात असे नमूद करताना आ.जगदीश मुळीक् यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी काढलेल्या लकी ड्रा मधे पहिल्या क्रमांकाचे फ्रीज चे बक्षीस ज्योती राज राठोड,दुसर्या क्रमांकाचे सोफा कम बेड सौ.अनीता सुहास नावरकर,तिसरया क्रमांकाचे होम थियेटर रेवती कुलकर्णी,चौथ्या क्रमांकाचे सिंगल बेड+गादी सौ.प्रतिक्षा अमृतकर यांना,पाचव्या क्रमांकाचे सी.डी.प्लेयर सीमा हुंबे,यांना मिळाले.याव्यतिरिक्त ११ पैठण्या व अन्य बक्षिसांची महिलांनी लयलूट केली.संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले तर विशाल भेलके,उमेश भेलके,यांनी स्वागत/सत्कार,तर सौ.मन्जुश्री खर्डेकर,सौ.श्वेताली भेलके यांनी संयोजन केले.
या संपूर्ण महोत्सवाचे संयोजन संदीप खर्डेकर,विशाल भेलके आणि उमेश भेलके यांनी केले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रमपुणे : युवा कलाकार...

अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा:निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार,निधी वाटपावर भाजपचे आमदारही...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत...

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण...