Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रामोशी समाजाला महामंडळ मिळावे : आ . महादेव जानकर यांची मागणी

Date:

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आद्यक्रांतिवीर 
उमाजी नाईक यांच्या 224 वी जयंती साजरी
 
पुणे : 
 
रामोशी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणात पुढाकार घेणे गरजेचे आहे , या समाजातून स्पर्धा परीक्षात यशस्वी होणारे युवक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत राज्य शासनाने रामोशी समाजाला  महामंडळ द्यावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज जाहीर केले . 
 
राष्ट्रीय समाज पक्ष आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक राजे संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जन्मभूमी असलेल्या भिवडीमध्ये आज (दि. 7) 224 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम राजभवन भिवडी (ता. पुरंदर) येथे सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी झाला. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक  यांच्या प्रतिमेस पुष्पहार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
 जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतरे ,खासदार अमर साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून आमदार महादेव जानकर बोलत होते
 रामोशी समाजाला  महामंडळ द्यावे यासाठी आपण मुख्य मंत्र्यांची भेट घेवू ,तसेच भिवडी येथे राष्ट्रीय स्मारक उभे राहावे यासाठी प्रयत्न करू ‘असे महादेव जानकर यांनी यावेळी जाहीर केले 
कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर , प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर ,प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्ष दशरथ राउत , संपतराव टकले ,महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर ,बापूराव सोनवलकर ,सुरज खोमणे ,मल्लिकार्जुन पुजारी ,डॉ उज्वला हाके उपस्थित होते
महोत्सव समिती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन  नगरसेवक यशवंत भांडवलकर, तुषार खोमणे, अशोक खोमणे, पोपटराव खोमणे, माऊली खोमणे यांनी केले. सकाळी 11 वाजता जेजुरी गडावर अभिषेक झाला. सासवड नगरपरिषद ते भिवडी असा भव्य मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी भिवडी येथील शासकीय स्मारकात अभिवादन आणि डॉ. नारायण टाक यांचे व्याख्यान झाले.
क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या काशिलिंग आडके, अशोक गुंजाळ, संजय बोडरे यांच्यासह युवा शास्त्रज्ञ डॉ. नीलेश तरवळ यांचा करण्यात आला. यावेळी शंकरभाऊ तडाखे, पुणे (समाज गौरव), रघुनाथ मदने, सांगली (समाजभूषण), संजयराव बोडरे, सातारा(क्रीडाभूषण), पंडीत मोडक, पुणे (जीवनगौरव), पुंडलिक काळे, बारामती (समाजभूषण), युवा नेते संजय जगताप (सहकारभूषण), शिवराज झगडे, जेजुरी (पत्रकार), ऋतुराज काळे, बारामती (समाजगौरव) यांना पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई- बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेदापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या...