जगभर महिलांचे हक्क व विकासासाठी कार्य करणाऱ्या युनायटेड नेशन्सच्या वूमन विभागाने नुकतेच आनंद बनसोडेला त्याच्या मागील मोहिमाविषयी चर्चेसाठी बोलावले होते (ता.-१८). या चर्चेमध्ये स्त्री-पुरुष समानतेसोबतच इतर अनेक बाबतीत चर्चा केली गेली. यामध्ये आनंदचा “हीफॉरशी पर्सन” म्हणूनही गौरव केला गेला.
यापूर्वी भारताचा शिखरवीर , विक्रमवीर आनंद बनसोडे याने आपली प्रत्येक मोहीम एका सामाजिक विषयासाठी समर्पित केली होती. याद्वारे युरोपातील एल्ब्रूस मोहीम मुलीना व अनाथाना शिक्षणासाठी, आफ्रिकेतील किलीमांजारो मोहीम झाडे लावा व निसर्ग संवर्धन, ऑस्ट्रेलियातील माउंट कोस्कीस्झ्को मोहीन ही युनायटेड नेशन्सच्या स्त्री-पुरुष समानतेसाठी समर्पित केली होती. युनायटेड नेशन्स च्या हीफॉरशी मोहिमेसाठी समर्पित केलेल्या त्याच्या ऑस्ट्रेलिया खंडातील १० सर्वोच्च शिखरांच्या मोहिमेबद्दल नुकतेच युनायटेड नेशन्स ने त्याचे कौतुक केले असून नुकतेच दिल्ली येथील युनायटेड नेशन्सच्या ऑफिसमध्ये त्याला चर्चेसाठी व त्याचे अनुभव ऐकण्यासाठी निमंत्रित केले होते.यावेळी भारत,भूटान,मालदीव,श्रीलंका या देशांच्या युनायटेड नेशन्सच्या मुख्य रीप्रेझेंनटेटीव्ह अमेरिकेच्या डॉ.रिबेका तवारेस व आफ्रिकेच्या नोरोह नेको यांनी आनंदचे त्याच्या या कार्यासाठी अभिनंदन केले. याच वेळी डॉ.रिबेका तवारेस यांनी आनंदला हीफॉरशी चा बिल्ला लावून “हीफॉरशी पर्सन” म्हणून गौरवले.
गेल्या वर्षात युनायटेड नेशन्स ने जगभर स्त्री-पुरुष समानतेसाठी “हीफॉरशी” ही मोहीम सुरु केली होती. हॉलीवूड ची अभिनेत्री इमा वाटसन हिने या मोहिनेसाठी जगभरातील लोकांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते. “आता नाही तर कधीच नाही, मी नाही तर कोणीच नाही” अशी साद देत या मोहिमेची जगभर सुरवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत पुरुषांनी स्वतहून पुढे येवून स्त्रियांना समान वागणूक देण्याची शपत व त्याद्वारे इतरांनाही प्रेरित करण्यासाठी काम करावे असा या मोहिमेचा उद्धेश आहे. भारत तसेच इतर पुरुषप्रधान देशात या मोहिमेला अल्प प्रतिसाद आहे.
आनंदने गेल्या ऑक्टोबर महिन्यात युनायटेड नेशन्सला यासाठी संपर्क केला होता व त्याच्या ऑस्ट्रेलिया मोहिमेसाठी या हीफॉरशी साठी कार्य करण्याची परवानगी घेतली होती. या अंतर्गत तीन जोडपी व तीन मुलीनी ऑस्ट्रेलिया मधील सर्वोच्च शिखर माउंट कोस्झीस्को वर या सर्वांनी स्त्रीपुरुष समानते साठी शपत घेतली होती. तसेच सिडनी च्या आकाशात १४००० फुट उंचीवरून स्काय डायविंग करून आनंदच्या कल्पनेतील उपक्रम “हीफॉरशी” साठी केला होता. आनंदची ही स्टोरी लवकरच न्यूयोर्क(अमेरिका) व ऑस्ट्रेलिया येथील युनायटेड नेशन्सच्या ऑफिसमध्ये भारतातील ऑफिसमधून पाठवली जाणार असून तिथून ती जगभर पोहचणार आहे. आनंदला इथून पुढे हीफॉरशी अंतर्गत होणाऱ्या युनायटेड नेशन्सच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाणार आहे.
आई-वडिलांनी समानतेची वागणूक दिली- आनंद बनसोडे
“३ मुलीनंतर मुलगा नाही म्हणून माझ्या आईला नातेवाईकाकडून खूप त्रास झाला होता, तरीही माझ्या जन्मानंतर आई-वडिलांकडून मला कोणतीही विशेष वागणूक न देता माझ्या ३ बहिणींना व मला समान वागणूक मिळाली. माझी आई, ३ बहिणी, ९ भाच्या व असंख्य मैत्रिणीमुळे स्त्रियांविषयी समानतेची भावना रुजण्यास मदत झाली. आज युनायटेड नेशन्समध्ये जे काही सांगू शकलो ते फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यातील सर्व महिलांमुळेच. “हीफॉरशी पर्सन” त्यांच्यामुळेच बनू शकलो.”