मुंबई- “मै उनको नहीं छोडूंगा, इसकी किमत चुकवाऊंगा”,असा धमकीचा इशारा आहे मुंबईवरील 1993 च्या स्फोटाचा आरोपी टायगर मेमनचा ; आणि तो चक्क हे स्वतःच्या आईजवळ बोलला आहे अशी माहिती आता पुढे आली आहे गेल्या 22 वर्षांपासून जो भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून जो लगेच पसार झाला, त्या कुख्यात डॉन टायगर मेमनचा आवाज मुंबई पोलिसांनी पुन्हा ऐकला.नागपूर जेलमध्ये 30 जुलैला जेव्हा याकूब मेमनला फाशी दिली जात होती, त्याच्या केवळ 40 मिनिटे आधी टायगर मेमननं आपल्या आईशी बातचीत केली होती. तसंच यावेळी तो बदल्याची भाषाही करत होता. ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ या दैनिकाने याबाबतची बातमी दिली आहे
मेमन कुटुंबीयांच्या लँडलाइन नंबरवर पोलिसांचं बारीक लक्ष होतं. ३० जुलैला पहाटे ५.३५ वाजता हा फोन वाजला. मेमन कुटुंबातील एका सदस्यानं तो उचलला. टायगरनं ओळख न सांगताच इकडच्या व्यक्तीनं त्याला ओळखलं. थोडं संभाषण झाल्यानंतर टायगरनं आईला फोन द्यायला सांगितलं. सुरुवातीला ती फोनवर येत नव्हती. तेव्हा एकानं, ‘भाईजान’चा फोन आहे… बोल, असं सांगितलं. ती हुंदके देतच फोनवर आली. तिचा हे रडणं ऐकून टायगर बदल्याचीच भाषा करू लागला. त्यावर, हनिफा चिडल्या. आता पुरे झालं, अशी विनवणीच त्यांनी केली. पण त्यानंतरही टायगरनं धमकी दिलीच. आपला फोन ट्रेस होऊ नये म्हणून टायगरनं हा कॉल वॉईस इंटरनेट प्रोटोकॉलने केला होता. ठरावीक सेकंदांनी त्याचा आयपी अॅड्रेस बदलत होता. त्यामुळे तो नेमका कुठून केला होता, हे शोधून काढणं अत्यंत कठीण आहे. पण त्याचे इरादे या फोनमुळे कळू शकले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी. छोटा शकीलनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला फोन करून ही धमकी दिली होती. त्यानंतर आता टायगरनंही तशीच भाषा केल्यानं गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क झालेत.
याकूबच्या फाशीचा बदला घेईन- टायगर मेमन
Date: