पुणे : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत राज्याच्या 254 शहरांतील वीज यंत्रणेचे
सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळें यांच्या विशेष प्रयत्नांमुळें या योजनेची राज्यात अंमलबजावणी होत आहे.
या योजनेत पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी, जुन्नर या
शहरांसह खडकी, देहू रोड व पुणे कन्टोंनमेंट बोर्डांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत (Integrated Power
Development Scheme) राज्याला सुमारे अडीच हजार कोटी रुंपयांचा निधी मिळंणार असून
त्याद्वारे वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी
भागासोबतच ग्रामीण भागातील ग्राहकांना 24 x 7 वीजपुरवठा मिळांवा यासाठी वीज यंत्रणेचे सक्षमीकरण
करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये मुंबईतील बेस्टसह महावितरणच्या 44 मंडल कार्यालयांचा समावेश करण्यात आलेला असून
2011 च्या जनगणनेनुसार 5 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये या योजनेतील कामे होणार
आहेत. या योजनेमध्ये 33 किव्होची 128 नवीन उपकेंद्रे उभारण्यात येणार असून 60 उपकेंद्रांची क्षमतावाढ
करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुमारे 3 हजार 778 कि.मी. च्या उच्चदाब तर 3 हजार 151 कि.मी.च्या
लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहेत. याशिवाय या सर्व भागांत 6,060 नवीन वितरण रोहित्रे उभारण्यात
येणार आहेत.