महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टो.बोर्ड विभाग निर्मित गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन पुणे मनपा मनसे गटनेते बाबू वागसकर व शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक बाळा शेडगे, आरती बाबर,राजू पवार, प्रशांत मते, साईनाथ बाबर , आयोजक विकास भांबुरे, लक्ष्मीकांत बुलबुले, आयुब खान आदी उपस्थितहोते.
या आरती संग्रहामध्ये गणपती,शंकर, दुर्गामाता,दत्त,विठ्ठल, हनुमान,महालक्ष्मी, हरितालिका आदी देवांच्या आरत्या , गणपती स्तोत्र, पसायदान,गणपतीची आवडती २१ पान , फुल व अत्यावश्यक क्रमांक याची माहिती देण्यात आली आहे.