मुंबई
पालघर येथील सागरी किनारा सुरक्षा मुख्यालय आणि रिझर्व्ह बँकेची काही खाती गुजरातला हलवल्यानंतर आता पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही गुजरातला हलवण्याची मागणी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले ,”केंद्र सरकार मुंबई व महाराष्ट्रावर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय अजिबात करणार नाही. केंद्र सरकार हे महाराष्ट्र आणि मुंबईचे हीतच पाहणार. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यालय अहमदाबादला हलवा, ही मागणी केली आहे. त्यामुळे राजकारण करणाऱ्यांनी निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवावा
अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेसाठी मध्यभागी असल्याने पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे हलवावे, अशी मागणी भाजपचे अहमदाबादचे (पश्चिम) खासदार किरीट सोळंकी यांनी लोकसभेत केली आहे. या मागणीचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या मागणीस प्रखर विरोध तर केलाच आहे, शिवाय सर्वसामान्य मुंबईकरांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
रेल्वे वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढून मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करण्याएवजी मुख्यालय गुजरातला हलवण्याची मागणी म्हणचे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे.
मराठी माणसाचे नशीब उजळणार कि काजळजळ होणार ? …आता पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही गुजरातला हलवण्याची मागणी
Date: