नवी दिल्ली -भारत विश्वचषक सामन्यात पाकिस्तान विरुध्द जिंकल्याने भारतात जल्लोष झाला तर भारताविरुद्ध विश्वकरंडकात सहाव्यांदा हार पत्करावी लागल्यामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली. अनेक चाहत्यांनी टीव्ही सेट रस्त्यावर येऊन फोडले. पाकिस्तानात खेळाडूंच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या.
विश्वकरंडकात सातत्याने पराजित होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या वेळी तरी जिंकू असे वाटत होते; पण पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला लाज आणली, असे पाकिस्तानी चाहते सांगत होते. कराचीत काही चाहत्यांनी टीव्ही सेट रस्त्यावर आणून फोडले असल्याच्या क्लिप पाकिस्तानातील सामा दूरचित्रवाणी वाहिनीने प्रसारित केल्या.
भारतात जल्लोष तर पाकिस्तानात रस्त्यावर टीव्ही सेट फोडले
Date: