Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याला आज प्रारंभ

Date:

पहा फोटो
Nashik+Mahakumbh+Mela+2015+flag+hoistingkumbh mela11742762_700952096699105_5814971976456877626_n10411791_700952066699108_908381297660858139_n11143580_700952126699102_6651954861324878399_n11013023_700952193365762_6738349750241585808_n11709584_453383251505322_2859004318260707969_n
नाशिक –बारा वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आज, मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाने कुंभमेळ्याच्या पावन पर्वाची सुरुवात झाली. मंगळवारी सहा वाजून १४ मिनिटांनी सिंह राशीत गुरूने प्रवेश करताच सिंहस्थ कुंभ पर्वाला प्रारंभ झाला.
त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली. या सोहळ्यासाठी ५० किलाे वजनाची पंचधातूची ध्वजपताका तयार करण्यात आली आहे. या पताकेवर गुरू, सूर्य, चंद्र, गाेदावरी व वाहन मगर, दशदिशा, बारा राशी यांसह अाेम ऱ्हीम, स्वस्तिक अशी चिन्हे अाहेत. ध्वजपताकेवर दाेन लाख खर्च झाला अाहे. कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंचीच्या खांबावर ही पताका बसवण्यात आली.
या वेळी सर्व आखाड्यांच्या साधू महंतांसह भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दर 12 वर्षांनी होणाऱ्या या कुंभ मेळ्याचे सर्वच हिंदु धर्मियांसाठी खास महत्त्व असते. या काळात नाशिकमध्ये स्नानासाठी भावीक आवर्जुन येत असतात.ध्वजारोहण कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. राजनाथसिंह सोमवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले. गृहमंत्री राजनाथसिंग, पकंजा मुंडे त्र्यंबकेश्वर येथे तर उर्वरित मंत्री नाशिकमधील कार्यक्रमाला हजर आहेत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माळेगाव कारखाना:अजित पवार यांचाच दबदबा

पुणे/बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

अधिक माहिती घेतली असतामहिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या...

अकरावी प्रवेश: निवड यादी गुरुवारी

पुणे-इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित 'कॅप' फेरीतील निवड...

उद्या धनकवडीत पाणी पुरवठा बंद —

पुणे-आंबेगाव फाटा, धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे...