पुणे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण अर्जुन खुर्पे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ४२ वर्षाचे होते . त्यांच्यामागे आई , वडील , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे .
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष अड. अर्जुन खुर्पे यांचे ते चिरंजीव होते . तर पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे विधी सल्लागार अड. सुर्यकांत खुर्पे यांचे पुतणे होते . त्यांच्यावर वानवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक , सामाजिक , राजकीय पदाधिकारी , लष्कर न्यायालयातील वकील बांधव आणि कार्यकर्ते आणि वानवडी ग्रामस्थ उपस्थित होते ,