पुणे- पुण्याजवळ थेऊर परिसरातील कोलवडी गावाच्या हद्दीत आज सायंकाळी पाचच्या सुमारास भारतीय हवाईदलाचे सुखोई विमान कोसळले.या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असला तरी वैमानिकांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले आहे.
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ च्या सुमारास हवाई दलाच्या ताफ्यातील सुखोई विमानाने उड्डाण केले होते. प्रशिक्षणाचा भाग म्हणून विमानाचे उड्डाण झाले होते. मात्र थेऊर परिसरात गेल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. विमान कोसळत असल्याचे कळताच वैमानिकांनी पॅरॉशूटच्या मदतीने विमानाच्या बाहेर उड्या मारल्या . त्यानंतर थोड्याच वेळात विमानाला मोठी आग लागली. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. सुखोई -३० एम के इ या लढाऊ प्रकारातील हे विमान आहे.
पुण्याजवळ हवाईदलाचे सुखोई विमान कोसळले-जिवीतहानी टळली
Date: