पुणे- भाजपच्या केंद्रातील सरकारने आणलेल्या स्मार्ट सिटी योजनेला आता राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे स्पष्ट झाले असून स्मार्ट सिटीसाठी सुप्रिया सुळे यांनी आपल्या खडकवासला लोकसभा मतदार संघातून रॅलीकाढली आणि जनजागृती केली यावेळी त्यांनी स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पुणे येणाऱ्या पिढीसाठी असावे यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहेअसेप्रतिपादनहि केले
या शिवाय त्यांनी आपलेया फेसबुक खात्यावरही याबाबत उल्लेख केला आहे त्यात असे म्हटले आहे कि , पुणे शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. खडकवासला येथील वारजे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटीच्या संकल्पनेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नगरसेवक श्री.दिलीप बराटे यांनी रॅलीचे आयोजन केले होते. तब्बल ३ हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. पुणे स्मार्ट सिटी होण्यासाठी काय केले जावे, मुलांच्या संकल्पना काय आहेत याचे चित्रफलक घेऊन शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पुणे येणाऱ्या पिढीसाठी असावे यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.