पुणे : महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या मुंढवा जॅकवेलचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गुरूवारी झाले.
मुंढवा केशवनगर येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून साडेसहा टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेला जॅकवेल, पंपहाऊस आणि साडेतीन किलोमीटरच्या पाईपलाईनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार अजित पवार, आमदार जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका आणि खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्यातील करारनाम्यानुसार 11.50 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करून देताना 6.50 टीएमसी प्रक्रिया केलेले सांडपाणी मुठा उजवा बेबी कालव्यात सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याची अट अंतर्भूत आहे. त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेकडून 6.50 टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना करण्यात आली आहे.
यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जलसंपदा विभागाचे अतुल कपोले, खडकवासला विभागाचे लोहार आदी उपस्थित होते.