जम्मू-उधमपूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या सिमरौली येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर बेछुट गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवान शहीद झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला जिवंत पकडण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.
श्रीनगर महामार्गावरील उधमपूरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला जिवंत पकडण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. पाच तासांच्या थरारक चकमकीनंतर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अटक केली. २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबनंतर जिवंत पकडलेला हा पहिलाच अतिरेकी आहे. कासिम खान असं या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.
उधमपूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या सिमरौली येथे दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्याला लक्ष्य केलं. विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकमध्ये हे दहशतवादी होते. त्यांनी आधी ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर बेछुट गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवान शहीद झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यातून सावरत, बीएसएफनं दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर, दुसऱ्या दहशतवाद्यानं दोन ग्रामस्थांना ओलीस धरून गोळीबार सुरूच ठेवला होता.
पाच तासांच्या थरारक चकमकीनंतर पाकिस्तानी अतिरेकी जिवंत पकडला
Date: