Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पर्यावरण रक्षण व शारीरिक स्वास्थ्यासाठी पुणे-बारामती सायकल स्पर्धा

Date:

11232949_456913887818925_6752034869349942125_n 11750607_456913777818936_2808666117734890054_n 11752512_456913824485598_7719215943302246004_n

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अमृत महोत्सवी वर्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचेही अमृतमहोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मदिवस या सर्वांच्या एकत्रित योगाने आज सकाळी ‘पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन ऐतिहासिक शनिवारवाडा येथे आज सकाळी शरद पवार यांच्या हस्ते स्टार्ट फ्लॅग फडकावून झाले. या उद्घाटन प्रसंगी श्री. पवार म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण आणि आपले शारीरिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आज या स्पर्धेनिमित्त पुणे ते बारामती रस्त्याच्या दुतर्फा उभे राहणाऱ्या लोकांना स्पर्धकांकडून या दोन्ही गोष्टींसाठी महत्त्वाची प्रेरणा मिळणार आहे.

या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण ,अश्विनी कदम ,विशाल तांबे ,अप्पा रेणुसे ,चंचला कोद्रे ,रवींद्र माळवदकर उपस्थित होते   यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेला भारताच्या ११ राज्यातून आलेले स्पर्धक तसेच पुणे विद्यापीठात शिकणारे परदेशी विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई- बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेदापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या...