राज्यातील सर्व सरकारे सारखीच …
पुणे-वर्षानुवर्षे पिण्याचे पाणी मिळेना म्हणूनं महाराष्ट्राचा निषेध करीत सांगली जिल्हयातील ४२ गावे कर्नाटकात वास्तव्याला निघाली आहेत येत्या १७ जून ला ही ४२ गावे बंद ठेवून येथील नागरिक पदयात्रा काढून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत . तत्पूर्वीच त्यांनी कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यासह कर्नाटकच्या राज्यपालांनाही आम्हाला कर्नाटकात घ्या म्हणून निवेदन दिले आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यामान्त्रांनाही निवेदन पाठविले आहे …
येथील पाणी संघर्ष समितीचे सुनील पोद्दार आणि अनिल शिंदे यांनी संगितले कि , २०१२ मध्येच येथील नागरिकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता . तेव्हा न्हाजापा आणो शिवसेना नेत्यांनी समजूत काढली आश्वासने दिली पण अजूनही येथील ४० वर्षापूर्वी मारलेल्या मैसाल जलयोजनेतून पाणी मिळालेले नाही गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे. जत तालुक्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ४२ गावं असून या गावात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्यासाठी आम्हाला दररोज मैलोन मैल चालावं लागतं, स्त्रियांना याचा त्रास होत असल्याची तक्रार एका महिला ग्रामस्थानं केली.
तर स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या या दुर्लक्षाला कंटाळून या गावातील रहिवाशांनी कर्नाटकमध्ये जाण्याची तयारी सुरु केल्याचं या ग्रामस्थांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
मैसाल चे पाणी जत च्या वेशीवर पोहोचलेय पण राज्य सरकारच्या दुर्लक्षाने ते जनतेपर्यंत पोहोचलेले नसल्याचे समजते
धक्कादायी बातमी -पिण्याच्या पाण्याचं वास्तव – महाराष्ट्राचा निषेध करीत ४२ गावे निघाली कर्नाटकात वास्तव्याला …
Date: