सिद्धांत’ या सिनेमानंतर आता निलेश नवलखा आणि विवेक कजरिया यांची निर्मिती असलेला ‘चौर्य’ सिनेमा प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. दमदार विषय असलेल्या सिनेमांची निर्मिती करण्यात हातखंडा असलेले हे निर्माता आता ‘चौर्य’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आलाय.देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड … हे गाणे यातील लक्ष्यवेधी ठरते आहे
चौर्य’ या टायटलवरून सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. सिनेमाचा टीझर सिनेमाची आणखीही उत्सुकता वाढतो. समीर आशा पाटील यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून लेखनही त्यांनीच केले आहे. तर सिनेमात किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, त्रिथा मुरबाडकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात सोशल क्राईम थ्रिलर कथा असून एक वेगळाच विषय यातून पुढे येणार आहे. ‘फॅन्ड्री’, ‘अनुमती’, ‘सिद्धांत’, ‘शाळा’ सारखे वेगळे सिनेमे देणारे हे निर्माते नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येत असतात. त्यानुसारच याही सिनेमातून काही धमाल बघायला मिळेल असे टीझरवरून वाटते आहे.