पुणे:
दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेच्या महिला शाखेचे उद्घाटन शनिवारी बँकेच्या उपाध्यक्ष मुमताझ सय्यद यांनी केले. हुंडेकरी कॉम्प्लेक्स, नाना पेठ येथे ही महिलांसाठीची शाखा आहे.
बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ‘प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना’ या दोन सेवा योजनांचे ग्राहकांसाठी उद्घाटन करण्यात आले. बँकेच्या 26 शाखांमध्ये ही योजना ग्राहकांसाठी खुली करण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी सांगितले. यासाठी ‘भारतीय जीवन बीमा महामंडळ’ आणि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीशी करार करण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी ‘ओरिएंटल इन्शुरन्स’चे अभिषेक शेंडीकर, ‘जीवन बीमा निगम’चे वरिष्ठ शाखा प्रबंधक एस्.एल.हरिदास, शाखा व्यस्थापक अजय यादव, बँकेचे संचालक एस.ए.इनामदार, अझिम गुडाखुवाला, चिरागउद्दीन शेख, मुन्नवर शेख, तस्लिम शेख आदी संचालक वर्ग अधिकारी तसेच चाँद शेख, दानिश शेख, यामिन अन्सारी, शाहीद इनामदार (गोल्डन ज्युबिली ट्रस्टचे संस्थापक), जंगबहाद्दूर मन्द्रुपकर, अहमद शेख, इम्तिहाज मुल्ला, अब्दुल कादीर खान, लुकमान खान, सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.