पुणे-जुलै महिन्यात फरासखाना पोलिस ठाणे परिसरात झालेल्या स्फोटामुळे इथल्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दाट लोकवस्ती असल्यामुळे अशा विघातकी घटकांवर नजर ठेवण्यास पोलिसदल कमी पडत आहे. तसेच इथल्या नागरिकांची सुरक्षादेखील महत्वाची आहे या भागात भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.अशा घटना घडण्याचे एकमेव कारण म्हणजे अपुरी सुरक्षा व्यवस्था आहे. लोकसंख्येच्या मानाने पर्याप्त पोलिस दल नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. सत्तेत आल्यास पोलिसदलाचे मनोधैर्य व संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार असे कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गिरिश बापट यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ५० मध्ये सांयकाळी पाच वाजता प्रचार पदयात्रा सुरु झाली. तुळशीबाग गणपती येथून सुरु झालेली ही पदयात्रा व्यापार्यांच्या भेटी घेत बाबूगेणू चौकाकडे निघाली तेथून मंडई पोलिस चौकी भागात व्यापारी आणि नागरिकांच्या समस्या समजून घेत शिंदेआळी येथे पदयात्रा आली. त्यानंतर बाजीराव रोड, नातूबाग गणपती, बुरुडआळी, शनिपार, कुमठेकर पथ करत शर्मिली चौकात या पदयात्रेचे समापन करताना गिरिश बापट यांनी स्थानिकाशी संवाद साधला.
यावेळी कसबा मतदारसंघाचे राजेश येनपूरे, नगरसेवक अशोक येनपूरे, नगरसेवक दिलीप काळोखे, दिपक रणधीर, अशोक वझे, उदय जोशी, प्रदिप इंगळे, विनायक कदम, भारत निझामपुरकर, राहुल भाटे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, दिपक पोटे, सुहास
कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, निलेश कदम, प्रमोद कोंढरे, अरविंद कोठारी, रत्नदीप खडके, अक्षय संभूस, सुनिल रसाऴ, उपेंद्र चिंचाळकर, हेरंब पवळे, उदय कांबळे, सलिम काझी, सौ. गिरिजा बापट, रागिनी खडके, मोहना नातू, योगिता गोगावले, निर्मला कदम, विजया हंडे, रीना सपकाळ,
रूपाली कदम, शोभा गोखले, वैशाली नाईक आदी उपस्थितहोत्या.
दगडूशेठ गणपती मंदीर परिसर सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावणार
Date: