अनुभवाची खाण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. मात्र, हा आदर आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे उपमहापौर आबा बागुल म्हणाले.
पुणे शहर कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी कृष्णकांत जाधव होते. माजी आमदार मोहन जोशी, नीता रजपूत, नगरसेविका लक्ष्मीताई घोडके उपस्थित होत्या.
\आबा बागुल म्हणाले, मागील १५ वर्षांपासून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना काशी यात्रा घडवितो. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठांना पीएमटी पास कमी दरात मिळण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे प्रय▪करण्यात येईल. तसेच ५00 रुपये देण्याच्या योजनेची तरतूद बजेटमध्ये करण्यात येणार आहे. प्रतिमा इंगोले (विदर्भकन्या), लिज्जत पापडच्या चेतना नहार, कबड्डी सुवर्णपदकविजेती किशोरी शिंदे, बॉक्सिंगचे जागतिक खेळाडू अजितसिंग कोचर, वृत्तपत्रविक्रेत्या चंपाताई करपे यांना ‘प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उत्तम भुमकर यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठांचा आदर करण्याची परंपरा कमी होतेय : उपमहापौर
Date: