पुणे- शासकीय अंबर दिवा आणि पोलीस स्टीकर असलेल्या स्विफ्ट कारमधून गोव्याची दारू पुण्यात आणली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .
महेश रंगनाथ पायगुडे (वय ३४ रा. देशमुखवाडी , शिवणे , पुणे ) तसेच सोहन बुद्धी शहा (वय ३० ) संतोष जयसिंग विश्वकर्मा (वय २३ रा. उत्तमनगर ,पुणे ) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे . एम एच १२ जी एफ ७६०० या क्रमांकाची स्विफ्ट मोटार , आणि दीड लाखाचे गोवा राज्य निर्मित मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे . शिवण्यातील हॉटेल संस्कृती येथे हे मद्य आणून विकले जात . उप आयुक्त सुनील चव्हाण , अधीक्षक मोहन वरदे , निरीक्षक एस आर पाटील, पी बी सास्तूरकर ,दुय्यम निरीक्षक एस एस गोगावले आर पी शेवाळे आदींच्या पथकाने हि कारवाई केली