लखनौ- उत्तर प्रदेशात 614 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री यादव यांनी आज तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान स्वाइन फ्लूची लागण झालेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात रविवारी (ता. 1) 45 स्वाइन फ्लूचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. लखनौमध्ये 37, अलाहाबाद येथे 3, बरेलीमध्ये 2 व रायबरेली, मेरठ व फैजाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. उत्तर प्रदेशात यामुळे या रुग्णांची संख्या 614 एवढी झाली आहे.
उत्तर प्रदेशात स्वाइन फ्लू रुग्णांवर मोफत उपचार- अखिलेश यादव यांचे आदेश
Date: