विद्यापीठ रस्त्यावरील वृक्ष तोडणीसंदर्भात अधिकारी वृक्ष प्रेमींची पुन्हा पाहणी नंतर बैठकीचा निर्णय
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते कस्तुरबा वसाहत येथील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध झाल्यानंतर आज पालिकेने ९६ ऐवजी १० झाडे तोडून रस्ता रुंदीकरण कसे करता येईल याचा फेर प्रस्ताव नकाशा सह आणि मार्किंग सह पर्यावरण प्रेमी ,वृक्ष प्रेमी नागरिकांना दाखवला आणि समक्ष रस्त्यावरील वृक्षांची समक्ष पाहणी बुधवार दिनांक २९/७/२०१५ रोजी करण्यात आली
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत वृक्षप्रेमी नागरिकांनी समक्ष पाहणी केली . यावेळी विद्यापीठ चौकातील वडाच्या २ झाडांना कमी हानी पोहोचवून इतर ८ झाडे हटवून रुंदीकरण कसे करता येईल याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली
झाडे हटवून रुंदीकरण करणे विद्यापीठ चौकातील बॉटल नेक वर उपाय नाही असे सांगून तर सर्वकष वाहतूक आराखडा आणि फोरेन्सिक lab येथील जागा मिळवून रुंदीकरण असे उपाय वृक्ष प्रेमींनी सांगितले .
यावर पुन्हा पालिकेत ५ दिवसांनी बैठक आयोजित करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले . माधवी राहिरकर ,डॉ सुषमा दाते ,दीपक बिडकर ,चैतन्य हरम ,दीपक माने ,स्मिता कुलकर्णी यांच्यासह अनेक वृक्ष प्रेमी नागरिक तसेच वृक्ष प्राधिकरण सदस्य अमेय जगताप हे उपस्थित होते
कांना दाखवला आणि समक्ष रस्त्यावरील वृक्षांची समक्ष पाहणी बुधवार दिनांक २९/७/२०१५ रोजी करण्यात आली