नवी दिल्ली
सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू असतानाच, नववर्षात गृहपयोगी वस्तू आणि मोटारी-दुचाकी महागणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन्ही क्षेत्रांसाठी मागील युपीए सरकारने दिलेली अबकारी करातील सवलत सुरू न ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून, त्यामुळे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन्ससारख्या वस्तू आणि मोटारी, बाइक घेण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
या दोन क्षेत्रांना चालना देण्यासाठी अबकारी करात सवलती देण्याचा निर्णय युपीए सरकारकडून गेल्या फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. त्यानुसार छोट्या मोटारी, दुचाकी आणि व्यापारी वाहनांवरील अबकारी कर १२ वरून ८ टक्के, एसयुव्हींवरील अबकारी कर ३० वरून २४ टक्के, मध्यम आकाराच्या मोटारींवरील कर २४ वरून २० टक्के तर मोठ्या आकाराच्या मोटारींवरील कर २७ वरून २४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. गृहपयोगी वस्तूंसाठी हा दर १२ वरून १० टक्के करण्यात आला होता.
युपीएनंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनेही ही सवलत कायम ठेऊन तिला ३१ डिसेंबरपर्यंत (सहा महिने) मुदतवाढ दिली होती. मात्र, यापुढे तिला मुदतवाढ न देण्याचे सरकारने ठरवले असल्याचे अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मोटारी-दुचाकी आणि गृहपयोगी वस्तू महागण्याचे संकेत या क्षेत्रातील कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अबकारी कर वाढल्याने २०१५ मध्ये महागाई
Date: