मुंबई -‘टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या भावाला देऊ नका. याकूबला सोडा, टायगरला पकडा’ अशी एकामागोमाग एक ट्विट्सची मालिका लावून देणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं अखेर आपल्या ट्विट्सबद्दल माफी मागितली आहे. अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो.’ असे सांगत यावर पडदा टाकला आहे ‘याकूब मेमनच्या गुन्ह्यांचं समर्थन करण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता. तरीही माझ्या ट्विटमुळं गैरसमज निर्माण झाले असल्यामुळं मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ट्विटस मागे घेतो,’ असं सलमाननं म्हटलं आहे.
याकूब मेमनविषयी सलमान खाननं काल रात्री केलेल्या ट्विट्समुळं देशभरात गदारोळ माजला . सलमानचे वडील सलीम खान यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सलमानला झापलं. तसंच ट्विट्स मागं घेण्यास सांगितलं. त्यानंतर सलमाननं विनाअट माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला. तसेच सर्व धर्मांबद्दल माझ्या मनात आदर व श्रद्धा आहे आणि यापुढंही राहील,’ असं त्यानं म्हटलं आहे.
ट्विटरवरील आपल्या माफीनाम्यात सलमान म्हणतो, ‘टायगर मेमनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं मी म्हटलं होतं. त्यावर मी ठाम आहे. त्याच्या गुन्ह्यासाठी याकूबला फाशी होऊ नये असं माझं मत होतं. याकूब निर्दोष आहे असं मला म्हणायचं नव्हतं. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटांत अनेकांना जीव गमवावे लागले. निष्पापांची हत्या ही मानवतेची हत्या आहे, असं मी पुन्हा-पुन्हा म्हटलं आहे. तरीही माझ्या ट्विटमुळं गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळं मी माझी वक्तव्यं मागे घेतो. अनावधानानं माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल विनाशर्त माफी मागतो.’
अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो.’ — सलमान खान
Date: