दापोडी- दापोडी येथील पॉवर लाईन हेल्थ सेंटरच्या वतीने घेण्यात आलेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत अतुल पाटोळेने पॉवर लाईन श्री २०१६ किताब पटकविला तर बेस्ट बॉडी इम्प्रुमेंट अशोक तलवारे व बेस्ट पोझर म्हणून शाहरुख शेख यांनी यश संपादन केले.
पॉवर लाईन हेल्थ सेंटरच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश अंगणच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन आळंदीचे नगरपालिकेचे नगरसेवक अजित काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक डॉ. मदन कोठुळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्विकृत नगरसेवक सतिश काटे, धनंजय तापकीर, श्रीकांत म्होकर, अशिष पवार, समिर शेख, पांडुरंग पवार, राजेश इर्ले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून सुहास काळभोर, परशुराम चव्हाण, फिलिप्स अेमस आदींनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल – ५०- ५५ किलो गट प्रथम – उदय वाघमारे, द्वितीय – हिमांशु साळुंबे, तृतीय – साहिल दिवार, ५५-६० किलो गट – प्रथम चिन्मय काटे, द्वितीय – रोशल पवार, तृतीय – अभि सरकार, ६०- ६५ किलो गट – प्रथम – पृथ्वी जाधव, द्वितीय – सुरज आवचिंदे, प्रमोद लोंढे, ६५- ७५ किलो गट- प्रथम – अतुल पाटोळे, द्वितीय – वृषभ कासारे, तृतीय – महेश देशमुख, ७०- ७५ किलो गट – प्रथम – शाहरुख शेख, द्वितीय – अतुल कुलकर्णी, तृतीय – अमित पाटोळे.