अप्लावधीतच आपल्या उत्कृष्ठ गायकीने हिंदी आणि बेंगाली चीत्रश्रुष्टीत नावारूपास आलेली अन्वेषा आता .”तुझ्या विना” या गाण्यामार्फत मराठीत पदार्पण करत आहे, गोलमाल रिटर्न्स , डेंजरस इश्क़, रांझना, कांची द अनब्रेकेबल, रीवोल्वर राणी, प्रेम रतन धन पायो अश्या अनेक हिंदी चित्रपटातून आजवर तिने गाणी गायली आहेत.
एस व्ही पी एंटरपप्राईजेस तर्फे निर्मिती होत असलेल्या या गाण्याला संगीतकार प्रसाद फाटक यांनी संगीत दिलं असुन, याआधी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या “द्रौपदी से दामिनी” तसेच असिड हल्ल्यास बळी पडलेल्या स्त्री चि व्यथा सांगणारे “कुछ कांच के खाव्ब” या गाण्याला अनेक नामवंतांनी गौरवलं आहे.
“तुझ्या विना” हे एक रोमांटिक गाणं असुन पूनम घाडगे, चेतन मोहुतरे यांच्यावर हे चित्रित करण्यात आलं असुन,याचं छायाचित्रण जीवन मराठे यांनी केलं आहे. हे एक विरहगीत असुन लवकरच ते रसिकांना पाहायला मिळेल.या गाण्याच्या निर्मितीच्या प्रवासाबद्दल बोलताना प्रसाद फाटक म्हणाले कि “लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती.सुरवातीला काही गाण्यांना चाली दिल्या आणि त्या साधना सरगम,वैशाली सामंत,बेला शेंडे,नेहा राजपाल,स्वप्नील बांदोडकर यांसारख्या दिग्गज लोकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या, गाणी ऐकून अनेकांनी म्युझिक व्हिडिओ बनवण्यास सुचवले आणि या प्रवासाला सुरवात झाली.”तुझ्या विना” हे गाणं म्हणजे आमच्या निर्मिती संस्थेचा पहिला म्युझिक व्हिडिओ आहे,नवीन संगीतकार ,गीतकार,गायक आणि अभिनयात काही रचनात्मक करून दाखवणाऱ्या तरुणांना उत्तम व्यासपीठ मिळाव हा निर्मिती संस्था सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.