Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘सूर राहू दे’ नव्या रूपात प्रेक्षकांसमोर सादर झाल्याची उत्सुकता’ – संग्राम साळवी

Date:

नवे पर्व, युवा सर्व’ असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. झी युवाने आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी ‘सूर राहू दे’ ही नवी मालिका नुकतीच सादर केली आहे. ही मालिका १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस आली. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी  नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. गौरी ही नात्यांना आणि भावनांना महत्व देणाऱ्या आरोहीच्या भूमिकेत दिसणार आहे.  तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका सादर करणार आहे.

खऱ्या आयुष्यात संग्राम त्याच्या तन्मय या व्यक्तिरेखेपेक्षा खूप वेगळा आहे. संग्रामने या आधी साकारलेल्या सर्व भूमिका या ग्रामीण आणि रांगड्या होत्या, पण सूर राहू दे या मालिकेतून संग्राम एक अनोखी आणि त्याने आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळी भूमिका सादर करत आहे. त्याची तन्मयची व्यक्तिरेखा हि अत्यंत व्यावहारिक मुलाची आहे. तो नेहमी फॉर्मल कपडे परिधान करतो आणि तितकाच वक्तशीर व शिस्तप्रिय आहे. दुसरीकडे संग्राम खऱ्या आयुष्यात खूप हॅपी गो लकी आहे. त्याला कॅज्युअली ड्रेसअप व्हायला आवडतं. प्रेक्षक आणि संग्रामच्या चाहत्यांना एक वेगळा संग्राम ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे.

त्याच्या या वेगळ्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना संग्राम म्हणाला, “मला खऱ्या आयुष्यात कॅज्युअल ड्रेसिंग स्टाईल आवडते पण तन्मयची व्यक्तिरेखा माझ्या अगदी विरुद्ध आहे. तन्मय हा एका आघाडीच्या फूड चैन ब्रँड मध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. तन्मय या व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य म्हणजे मी याआधी कधीच चष्मा वापरला नाही आहे, पण या भूमिकेसाठी मला चष्मा देखील वापरावा लागणार आहे. माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे पण प्रेक्षक नक्कीच मला दाद देतील अशी मी आशा करतो.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...